अनधिकृत बांधकामांना कर्मचारीही जबाबदार !

February 8, 2011 2:38 PM0 commentsViews: 6

08 फेब्रुवारी

मुंबईतील अनधिकृत बांधकामांना आता महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनाही जबाबदार धरलं जाणार आहे. मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत आता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यंत्रणा राबवणार आहेत. तसं प्रतिज्ञापत्र त्यांनी आज हायकोर्टात सादर केलं. मालाडच्या बालाजी इंटरनॅशनल स्कूलच्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आयु्‌क्तांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. यात त्यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कशापद्धतीनं कारवाई केली जाणार आहे याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी हायकोर्टानं अनधिकृत बांधकाम करणार्‍या आर्किटेक्ट, बिल्डर्सवर काय कारवाई करणार त्याची माहिती देण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्याचप्रमाणे यापुढे बांधकामांबाबत प्रस्ताव सादर करणार्‍या आर्किटेक्टला अनधिकृत बांधकाम करणार नाही असं प्रतिज्ञापत्र द्याव लागणार आहे. तसेच अनधिकृत बांधकाम करणार्‍या अर्किटेक्चरवर कारवाई केली जाणार आहे.

close