कल्याणमध्ये वाळूचा उपसा करणार्‍या 9 बोटी पुन्हा जप्त

February 8, 2011 2:51 PM0 commentsViews: 2

08 फेब्रुवारी

कल्याण खाडीतून बेकायदेशीर वाळूचा उपसा करणार्‍या वाळू माफियांविरोधात कल्याण आणि भिवंडी तहसीलदार कार्यालयाने सयंुक्तरित्या कारवाई केली. याप्रकरणी नऊ बोटी आणि नऊ उपसा करणारे पंप आता पर्यंत ताब्यात घेण्यात आले असून या सामानाच्या मालकाचा शोध अधिकारी घेत आहेत. कल्याण आणि भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई ही एक फार्स असून असल्याचं बोललं जातं आहे. कारण दररोज या बंदरातून सुमारे 125 वाळूचे ट्रक पोलीस ठाण्याच्या जवळून पास होतात. तसेच कल्याण खाडीच्या पुलावरून ही चोरी सर्वांना दिसते. पण पोलीस अधिकारी आणि तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांना मात्र हे दिसत नाही. या आधीही अश्याच प्रकारे बोटी, रेतीचे ढिगारे आणि पंप ताब्यात घेण्यात आले पण कोणालाही अटक करण्यात आली नाही.

close