पुण्यात शिक्षणसेवकांचं धरणे आंदोलन

February 8, 2011 3:14 PM0 commentsViews: 37

08 फेब्रुवारी

17 जुन रोजी रत्नागिरीत शिक्षक भरतीसाठी गेलेल्या उमेदवारांना स्थानिकंाकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. याविरोधात राज्यभरातून आलेल्या शिक्षणसेवकांनी पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे. भरती प्रक्रियेवर स्थगिती आणर्‍यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. युवक क्रांती दलाच्या वतीने करण्यात आलेलं हे आंदोलन बेमुदत असल्याचं युवक क्रांती दलाचे अध्यक्ष कुमार सप्तरुषी यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलतांना त्यांनी शासनावर जोरदार टीकाही केली. राज्य शाषनाने या प्रकरणाचा गांभिर्याने विचार करुन त्वरीत न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिक्षण सेवकांनी केली आहे.

close