हा भारतीय कंठ संगीताचा सन्मान – पं. भीमसेन जोशी

November 4, 2008 5:34 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर, दिल्ली सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं.भीमसेन जोशी यांना ' भारतरत्न ' पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. राष्ट्रपती भवनातून पुरस्काराची घोषणा करण्यात आली. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी भारतरत्न हा सन्मान मिळणं हा संपूर्ण किराणा घराण्याचा तसंच भारतीय कंठ संगीताचा सन्मान असल्याचं म्हटलंय. याप्रसंगी दिवंगत पत्नी वत्सला जोशी यांची प्रकर्षानं आठवण झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. तीन मिनिटांच रेकोर्डिंग ऐकण्याकरीता आम्ही दहा किलोमीटर चालत जायचो अशी आठवणही त्यांनी सांगितली. सध्या कोणत्या प्रकारचं संगीत ऐकता, असं विचारलं असता पंडितजींनी संध्या कोणाचं ऐकत नाही. ज्यांचं ऐकत होतो ते वैष्णव लोकी गेले, असं त्यांनी सांगितलं. नवीन पिढीतला कोणता कलाकार आवडतो, यावर हा अवघड प्रश्न आहे, असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.

close