आदर्श सोसायटी तोडा आणि नंतरच झोपड्या तोडायला या -मेधा पाटकर

February 8, 2011 5:28 PM0 commentsViews: 3

08 फेब्रुवारी

आदर्श सोसायटी प्रकरणी एकीकडे सीबीआय चौकशी सुरु आहे आणि त्याचवेळी मेधा पाटकर आणि त्यांचे कायर्कर्ते आदर्शवर जाऊन धडकले. जर आमच्या झोपड्या नोटीस दिल्यानंतर लगेचच तोडल्या जातात तर आदर्शला नोटीस देऊनही इतके दिवस ती इमारत का उभी राहते असा सवाल करत घर बचाओ समितीच्या लोकांबरोबर मेधा पाटकर यांनी सोसायटीमध्ये घुसून आंदोलन केलं. आदर्श सोसायटी तोडा आणि नंतरच आमच्या झोपड्या तोडायला या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

close