पुण्यात हेरगिरी करणार्‍याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

February 8, 2011 5:32 PM0 commentsViews: 3

08 फेब्रुवारी

पुण्यातून हेरगिरीच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या सदर्न कमांडमधला जवान ब्रिजेश कुमारला आज 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. काही दिवसांपूर्वी पुण्यातून हेरगिरीच्या आरोपासाठी अटक करण्यात आलेल्या विशंभर अग्रवाल आणि लष्कराचा जवान असलेला ब्रिजेश कुमार सिंग पाकिस्तानातल्या आयएसआय संघटनेशी संबंधित असल्याच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली. आज ब्रिजेशकुमारला पुणे कोर्टात हजर करण्यात आलं.त्याच्यावर आय एस आय एजंट असल्याच्या संशय आहे. पाकिस्तानमध्ये त्यानं 500 कॉल केले तसेच त्याचे 4 अकाऊंट असून त्यावरुन त्यांनी मोठ्या रकमेच्या उलाढली केल्याचाही संशय आहे. आज ब्रिजेश कुमार 21 तारखेपर्यंत 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

close