‘अभिनव’च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

February 8, 2011 5:37 PM0 commentsViews: 2

08 फेब्रुवारी

पुण्यातील अभिनव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा देत संस्थेचे सचिव भालचंद्र पाठक यांना हटविण्याची मागणी केली. भालचंद्र पाठक यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज सलग दुसर्‍या दिवशी अभिनव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकत धरणा आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकरता जबाबदार धरत पाठक यांनी संस्थेतील शिक्षक प्रदीप पगाडे यांना झापल्यामुळे तो चक्कर येऊन खाली पडले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पाठक यांच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी सेनाही आंदोलनात उतरल्यामुळे आंदोलनाला धार चढली आहे.

close