ए.राजा यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

February 8, 2011 6:01 PM0 commentsViews: 1

08 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सीबीआयला याप्रकरणी आणखी काही माहिती आणि कागदपत्र मिळवायची आहेत. त्यामुळे त्यांनी राजांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. ए. राजा यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. राजा जेव्हा कोर्टात पोहचले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी मागच्याच आठवड्यात राजा यांना सीबीआयनं अटक केली होती.

close