आरूषी हत्याकांडात तलवार दाम्पत्य आरोपी

February 9, 2011 9:35 AM0 commentsViews: 3

09 फेब्रुवारी

बहुचर्चित आरुषी हत्याकांडाचा खटला सुरुचं राहणार आहे.आरुषी केस बंद करायला गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं नकार दिला आहे. या प्रकरणी आरुषीच्या आई-वडिलांनाच आरोपी करण्यात आलं आहे. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर आज गाझियाबादच्या सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिला.तलवार दाम्पत्यांना कोर्टानं समन्स बजावलंय. सीबीआयनं आपल्या तपासात आरुषीचे वडिल राजेश तलवार आणि आई नुपूर तलवार यांच्यावर संशय व्यक्त केला होता. खटल्याची पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे.

close