मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार

February 9, 2011 9:53 AM0 commentsViews: 2

09 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर बंदी आणण्याबाबत वक्तव्य केलं होतं. तसेच नांदेडमध्ये पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली होती. या संदर्भात काहीच कारवाई न झाल्याचा निषेध पत्रकारांनी केला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सोळा पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजची मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषदेचं वार्तांकन करण्यात येणार नाही.

close