भ्रष्ट अधिकार्‍याने जमवली 1000 कोटींची माया ; 12 दिवसांची पोलीस कोठडी

February 9, 2011 10:46 AM0 commentsViews: 15

09 फेब्रुवारी

पद- उपजिल्हाधिकारी.. कमाई – तब्बल 1000 कोटी रुपये आणि काम बिल्डरांच्या कागदपत्रांना बेकायदेशीर रित्या मंजुरी मिळवून देणं. महसूल विभागाच्या नितेश जनार्दन ठाकूर या भ्रष्ट अधिकार्‍याला मुंबई क्राईम ब्रँचन अटक केली. उपजिल्हाधिकारी म्हणून तसेच अनेक मंत्र्यांचा पी.ए. म्हणून काम केलेल्या नितेश ठाकूरने कागदपत्रांचा फेरफार, भूखंडाप्रकरणी बनावटगिरी करून तब्बल 1000 कोटींची माया जमा केल्याचं स्पष्ट झालं. एका बिल्डरनं केलेल्या तक्रारीनंतर तपासात खरा प्रकार पुढे आल्यावर नितेश ठाकूरला पोलिसांनी पुराव्यांसह ताब्यात घेतलं. पोलिसांनी नितेशसह त्याचा भाऊ निलेश ठाकूरला किल्ला कोर्टात सादर केलं तेव्हा कोर्टानं त्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

close