स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी बलवा यांना 2 दिवसांची सीबीआय कोठडी

February 9, 2011 10:57 AM0 commentsViews: 4

09 फेब्रुवारीवादग्रस्त टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी सीबीआयनं अटक केलेल्या शाहीद बलवांना सेशन्स कोर्टानं आज 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. बलवा डीबी रिऍलीटी कंपनीचे चीफ मॅनेजींग डायरेक्टर आहेत. राजा यांच्यासाठी बलवांनी अनेक कंपन्यांमध्ये गंुतवणूक केल्याचा संशय आहे. बलवा यांच्यावर दोन वेळा सीबीआयनं समन्स बजावलं होतं. मात्र त्यानी चौकशीसाठी हजर राहायला टाळाटाळ केली होती. त्यामुळे अखेर काल त्यांना अटक करण्यात आली होती. आज बलवांना मुंबईच्या सेशन्स कोर्टानं 2 दिवसांची सीबीआय कोठडी दिली.

close