नागपूर टेस्ट मॅच

November 4, 2008 5:34 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर नागपूर,ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर सीरिज गमवायची नसेल तर नागपूर टेस्ट त्यांना जिंकावीच लागणार आहे. चार टेस्ट मॅचच्या सिरिजमध्ये ऑस्ट्रेलिया सध्या एक-शून्यनं पिछाडीवर आहे. त्यामुळेच जिंकण्याच्या उद्देशानं ऑस्ट्रेलियन टीमनं नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर कसून सराव केला आहे. मॅथ्यू हेडनला या सीरिजमध्ये अद्याप फॉर्म सापडलेला नाही. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी करून दाखवण्यासाठी तो कसून सराव करतोय. ऑस्ट्रेलियन टीम नागपूर टेस्ट जिंकायला सज्ज असल्याचं माईक हसीनं पत्रकार परिषदेत म्हटलंय दुसरीकडे भारतीय टीमही सीरिज जिंकण्याच्या उद्देशानंच मैदानात उतरली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचं मैदान नेहमीच लकी ठरलंय. तर दुसरीकडे बॅड पॅचमधून जात असलेल्या राहूल द्रविडलाही त्याच्या सासूरवाडीमध्ये फॉर्म परत मिळवण्याची चांगली संधी आहे. व्हिसीएच्या या नव्या मैदानावर पहिल्यांदाच आतंराष्ट्रीय मॅच होतेय. साहजिकच मैदान आणि खेळपट्टीबद्दल दोन्ही टीमना फारशी माहिती नाही.

close