विलासरावांनी सावकार सानंदाना पाठीशी घालण्याचं काम केलं – फुंडकर

February 9, 2011 11:28 AM0 commentsViews: 9

09 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पदाचा दुरूपयोग करुन विलासराव देशमुख यांनी सावकार सानंदाना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पांडुरंग फुंडकर यांनी केला. ते बुलढाण्यात बोलत होते. या संदर्भात कोर्टानं ठोठावलेल्या दंडाची रक्कम राज्य सरकारऐवजी विलासराव आणि सावकार सानंदा यांच्या खिशातून वसुल करायला हवी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. यावर आता लवकरच जनहित याचिका दाखल करणार असल्याचंही फुंडकर यांनी सांगितलं. तर दुसरीकडे आमची लढाई अजून संपलेली नसून आमच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत आणि सावकाराला पाठीशी घालणार्‍या विलासरावांना दंड झाला पाहिजेे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

close