महावितरणच्या कर्मतार्‍यांचा विराट मूक मोर्चा

February 9, 2011 11:39 AM0 commentsViews: 9

09 फेब्रुवारी

महावितरणच्या कोकणविभागातले 400 ते 500 कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी आज खेड शहरातून विराट मूक मोर्चा काढला. 5 फेब्रुवारीला शिवसेनेने केलेल्या विविध विषयांवरच्या आंदोलनात एका शिवेसेनेच्या कार्यकर्त्याने महावितरणचे कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तावाडे यांना पोलिसांसमक्षच मारहाण केली होती. या कार्यकर्त्याला अटकही करण्यात आली आहे. मात्र अशी गुंडगिरी ताबडतोब मोडून काढावी या मागणीसाठी आणि घटनेचा निषेध म्हणून दापोली, खेड, चिपळूण, मंडणगड विभागाच्या महावितरण कर्मचार्‍यांनी खेड शहरातून ही मूक फेरी काढली.

close