अशोक चव्हाण यांनी घेतली सोनिया गांधीची भेट

February 9, 2011 1:14 PM0 commentsViews: 6

09 फेब्रुवारी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीआज दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांचा भेट घेतली आहे. चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आरोपी करण्यात आल्यापासून चव्हाण अस्वस्थ आहेत. आदर्श प्रकरणावरून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तसेच आदर्शच्या सीबीआय चौकशीत आरोपी सिध्द झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या राजकीय हालचालीला वेग आला. काही दिवसांपूर्वी चव्हाण समर्थकांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या घरी बैठक घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक निवेदन दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्याला महत्त्व आलं आहे.

close