कांद्याच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार – शरद पवार

February 9, 2011 1:22 PM0 commentsViews: 1

09 फेब्रुवारी

कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी कांदा उत्पादक करत असले तरी कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. कांद्याचे भाव कमालीचे कोसळल्यामुळे नाशिक जिल्ह्यातलं लासलगाव आणि चांदवड कांदा मार्केट बंद करण्यात आलं आहे. निर्यात बंदी मागे घ्यावी ही शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी पिंपळगाव आणि लासलगाव याठिकाणी शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला. दरम्यान कांदा निर्यातीवरील बंदी सध्या तरी मागे घेतली जाणं शक्य नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

close