लुईस हॅमिल्टनने इतिहास रचला.

November 4, 2008 5:38 PM0 commentsViews: 1

04 नोव्हेंबरफॉर्म्युला वनच्या या सिझनची शेवटची रेस ब्राझीलमध्ये पार पडली. ही रेस जरी फेरारीच्या फेलिपे मासानं जिकली असली तरी मॅकलॅरेन्सचा लुईस हॅमिल्टन फॉर्म्युला वनच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरलाय. इंटरलेगॉस, ब्राझील जिथे 2008च्या फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची शेवटची रेस पार पडणार होती. इथेच 2007मध्ये हॅमिल्टनला वर्ल्ड चॅम्पियनशिप गमवावी लागली होती. पण यावेळेला त्याला फक्त पहिल्या पाचात येण्याची गरज होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यत मॅचमध्ये अनेक नाटयमय घटना घडत होत्या 18 व्या लॅपपर्यत पाचव्या स्थानावर असलेला लुईस 68 व्या लॅपमध्ये मागे पडला. शेवटची एकच लॅप उरलेली असताना त्याच्या पुढची ग्लॉकची टोयोटा हळू झाली आणि हॅमिल्टनने वेग घेतला. त्यानं ग्लॉकला मागे टाकत 5वं स्थान पटकावलं. फेरारीचा मासा ब्राझीलीयन जीपीचा विजेता ठरला असला तरी लुईस हॅमिल्टनने इतिहास घडवला. तो एफ वनचा सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन झाला.

close