पुण्यात आणखी एक युएलसी घोटाळा !

February 9, 2011 4:21 PM0 commentsViews: 8

अद्वैत मेहता, पुणे

09 फेब्रुवारी

पुण्यात आदर्श किंवा 2 जी स्पेक्ट्रमपेक्षा मोठा युएलसी घोटाळा उघड झाला असतानाच या घोटाळ्यात समावेश नसलेल्या 11 कोटीच्या युएलसी घोटाळ्याचंच एक प्रकरण पुढे आले आहे. बिल्डरनं सरकारी अधिकार्‍याशी संगनमत करून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक रवी बर्‍हाटे यांनी केला. याप्रकरणी महानगरपालिकेने आता चौकशीचे आदेश दिले आहे.

पुण्यातील धनकवडी परिसरातील 2 एकर जमीन 1976 च्या युएलसी कायद्यानुसार अतिरिक्त ठरवली जाऊन सरकार जमा झाली होती. मूळ मालकानं 2000 मध्ये युएलसीचे अधिकार्‍याबरोबर संगनमत करून बनावट कागदपत्र तयार करून सरकार जमा झालेली ही मिळकत परत मिळवली. रवी बर्‍हाटेयांनी हा घोटाळा उघड करून महापालिकेकडे तक्रार केली. बर्‍हाटे यांचा आरोप आहे की बिल्डरसोबत अधिकारीही यात सामील आहेत.

महापालिकेच्या पत्रात खाडाखोड करून प्रशासनाची दिशाभूल करून मूळ मालकाने ही जमीन परत मिळवली जीची आजच्या बाजारभावाने किंमत होतेय 11 कोटी रूपये इतकी. पुणे महानगरपालिकेनं याची गंभीर दखल घेत युएलसी कार्यालयाकडून कागदपत्र मागवली आहे. आरोप सिध्द झाले तर यात फौजदारी गुन्हेही दाखल होऊ शकतात. नुकतेच मुंबई हायकोर्टानं भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी पुण्यातील युएलसी घोटाळ्याच्या सीबीआय चौकशी करण्याचं सुचित केलं होतं. ज्या पध्दतीनं गेल्या 10 वर्षात पुण्यातील जागेचे भाव वाढलेत त्यावरूनही युएलसी घोटाळ्याची व्याप्ती सहज लक्षात येते. एकूणच पुण्यातील जमीन घोटाळ्यांची निपक्षपातीपणे चौकशी होण्याची गरज आहे.

close