पुण्यात महापौरांपासून जनगणनेला सुरूवात

February 9, 2011 5:29 PM0 commentsViews: 1

09 फेब्रुवारी

आज जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. पुण्यातही महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या कुटुंबीयांची नोंदणी करून याची सुरवात करण्यात आली. महापौरांनी सर्व नागरिकांना जनगणनेकरता येणार्‍या स्वयंसेवकांना खरी माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे 10 वी 12 वीच्या परीक्षा तोंडावर असताना जनगणनेच्या कामाला जुंपल्यामुळे शिक्षक वर्गान तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही जनगणनेच्या काळात 20 दिवस सुट्टी देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. तसेच जनगणनेकरता घर अथवा शाळेच्या जवळच्या परिसरातच काम देण्याचीही शिक्षकांची मागणी आहे.

close