2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात 50 अधिकारी दोषी !

February 9, 2011 5:58 PM0 commentsViews: 1

09 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रमचा तपास करण्यासाठी टेलेकॉम विभागाने नेमलेल्या न्यायमूर्ती शिवराज पाटील समितीचा अहवाल आयबीएन नेटवर्कच्या हाती लागला आहे. 2 जी स्पेक्ट्रमचा घोटाळा होताना नियमांचं उल्लंघन करणार्‍या 50 अधिका-यांची नावं या अहवालात देण्यात आली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोषी अधिकार्‍यांमध्ये राजांच्या कार्यकाळातले अधिकारी तर आहेत. पण त्याच बरोबर एनडीच्या काळातल्याही अधिकार्‍यांचीही नावं आहेत. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अरुण शौरी जेव्हा टेलेकॉम मंत्री होते तेव्हा जादा स्पेक्ट्रमचं वाटप करून खाजगी कंपन्यांना फायदा करून देण्यात आला असा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

close