गणेशमूर्तीच्या निर्णयामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या – उद्धव ठाकरे

February 9, 2011 5:59 PM0 commentsViews: 5

09 फेब्रुवारी

गणेशमूर्तीच्या संदर्भातल्या कोर्टाच्या आक्षेपामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत, शिवसेना हे कदापी खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला. एका पत्रकातून त्यांनी हा इशारा दिला आहे. गणेशभक्तांच्या लढ्यात शिवसेना आघाडीवर राहील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.मूर्तीचं विसर्जन पिण्याच्या किंवा सार्वजनिक वापराच्या पाण्यात होत नाही त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण कसा होणार असा सवालही ठाकरे यांनी केला. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातला फरक लोकांनी समजून घ्यावा, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी अधंश्रध्देविरुध्द मोठे लढे दिले आहेत त्यामुळे मला अनिसकडून काही शिकण्याची गरज नाही असही ठाकरेंनी या पत्रकात म्हटलं आहे.

close