कांद्याच्या भावाला मीच जबाबदार कसा – शरद पवार

February 10, 2011 8:38 AM0 commentsViews: 5

10 फेब्रुवारी

राज्यभरात कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे तर अजित पवार आणि मीडियाचं प्रकरण गाजत असतानाच कृषीमंत्री शरद पवारही आज मीडियावर नाराज झाले. काद्यांचे भाव वाढले किंवा कमी झाले तरी मीडिया मलाच जबाबदार धरते याबद्दल मीडियाचं कौतुक वाटतं असं पवार म्हणाले. यापुढे मीडियापासून दूरच राहिलेलं बरं असं सांगत त्यांनी मीडियावरची आपली नाराजीही स्पष्टपणे व्यक्त कली. ते सातार्‍यात बोलत होते.

close