विदेशी बँकातील खातेदारांची नाव लवकरचं जाहीर !

February 10, 2011 9:54 AM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी

विदेशी बँकांमध्ये काळापैसा असणार्‍यांची नावं आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. विदेशी बँकेत खाते असणार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नावं जाहीर करु असं केद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. त्याचबरोबर हसन अली खानला देशाबाहेर जाऊ देणार नाही असंही केंद्रानं सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. काळ्या पैसा असणार्‍यांची यादी जाहीर करण्याबद्दलची सुनावणी आता 3 मार्चला होणार आहे.

close