पुण्यातील 11 कोटींच्या युएलसी घोटाळ्याची 21 फेब्रुवारीला सुनावणी

February 10, 2011 9:59 AM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारी

पुण्यात आदर्शपेक्षा मोठा युएलसी घोटाळा उघड झाला असतानाच या घोटाळ्यात समावेश नसलेल्या 11 कोटींच्या युएलसी घोटाळ्याचंच एक प्रकरण पुढे आलं आहे. बिल्डरने सरकारी अधिकार्‍याशी संगनमत करून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक रवी बर्‍हाटे यांनी केला आहे. याप्रकरणी महानगरपालिकेने आता चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान युएलसी घोटाळया प्रकरणाची पुढची सुनावणी आता 21 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबईच्या हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

close