रणजी सामन्यात तामीळनाडू टीमचं पारडं जड

November 4, 2008 5:42 PM0 commentsViews: 7

04 नोव्हेंबर नाशिक,नाशिकमध्ये सुरू असलेल्या रणजी सामन्यात तामीळनाडूच्या टीमनं महाराष्ट्राच्या टीमपुढे दुस-याच दिवशी चॅलेंज उभं केलंय.अभिनव मुकुंदची ट्रीपल सेंच्युरी आणि एम. विजयची डबल सेंच्युरी हे तामिळनाडू संघाच्या खेळाचे वैशिष्ठ्य ठरले.तामिळनाडूनं 3 बाद 648 धावांवर पहिली इनिंग घोषित केली. याला उत्तर म्हणून महाराष्ट्रानं आज दिवसअखेर 1 बाद 154 रन्सपर्यंत मजल मारली आहे. या आधी 1971 मध्ये झालेल्या कर्नाटक विरुद्ध गोवा या सामन्यात कर्नाटकचे रॉजर बिर्णा आणि संजय देसाई यांनी 451 रन्सची विक्रमी सलामी दिली होती. त्यानंतर आज तामीळनाडूच्या संघानं हा विक्रम मोडीत काढला. तामिळनाडूचे एम. विजय आणि अभिनव मुकुंद यांनी 462 रन्सची पार्टनरशीप केली. एम.विजयनं 243 रन्स केलं. तर मुकुंद 300 रन्सवर नाबाद राहिला.

close