नाशिकमध्ये युवकाच्या हत्येनंतर दगडफेक

February 10, 2011 8:07 AM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारी

नाशिक शहरात मध्यरात्री राहुल मोरे या युवकाची हत्या करण्यात आली. यामुळे वडाळा परिसरात तणाव निर्माण झाला होता. याठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यात एका शहर बसच्या काचाही फोडण्यात आल्या. तसेच या परिसरातील बार बंद करावा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र हे मारेकरी पाठवणार्‍या प्रमुख आरोपीला अटक करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

close