सातार्‍यात सात वर्षाचा मुलाचा खून

February 10, 2011 11:50 AM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी

सातारा जिल्ह्यातील वर्णे गावात एका सातवर्षीय मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. शंभू धस्के असं या मुलाच नाव आहे. काही महिन्यांपूर्वी याच गावातील कुणाल धस्के या मुलाचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी सागर धस्के या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोन्ही खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. सागर हा सायकोकिलर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मानसिक आजारातूनच त्याने खून केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

close