राज्य साहित्य मंडळाची गौरववृत्ती आणि सन्मानवृत्ती जाहीर

February 10, 2011 12:51 PM0 commentsViews: 6

10 फेब्रुवारी

राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आणि सन्मानवृत्ती जाहीर झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, शाहीर लीलाधर हेगडे यांचा गौरववृत्ती देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये रोख आणि मानचिन्ह हे स्वरुप आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 21 फेब्रुवारी ला साहित्यिकांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच या वेळी दहा साहित्यिकांचाही साहित्य सन्मान वृत्ती देऊन गौरव करण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या दहा साहित्यकांमध्ये रा. ग. जाधव, वसंत आबाजी डहाके, कमल देसाई , रा. रं . बोराडे, अनिल अवचट, अनिल केळकर ,भास्कर चंदनशिवे, तारा भवाळकर, विलास सारंग यांना सन्मानवृत्ती देण्यात येणार आहे.

close