पेट्रोलपंप चालकांचा 12 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 10, 2011 1:41 PM0 commentsViews: 7

10 फेब्रुवारी

मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्येनंतर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी धाडसत्र सुरु केलं. पण माफियांवर कारवाई करण्याऐवजी पेट्रोल पंप मालकांनाच वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप पेट्रोलपंप डिलर असोसिएशननं केला आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाच्या निषेधार्थ 12 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पेट्रोलपंप 12 तारखेपासून बंद राहणार आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलपंप मालक पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ करीत असल्याचं चूकीचं चित्र निर्माण केलं जात आहे. त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येत असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे.

close