मोहमद युसूफचं आंतरराष्ट्रीय करिअर धोक्यात

November 4, 2008 5:50 PM0 commentsViews: 10

04 नोव्हेंबरमोहमद युसूफची फास्ट बॉलर शोएब अख्तरबरोबर पाकिस्तानच्या 15 जणांच्या टीममध्ये निवड करण्यात आली. परंतु त्याचवेळेला युसूफ क्रिकेट खेळण्यासाठी भारतात आला असल्याचं त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलंय. याचाच अर्थ काही दिवसांत युसूफ आयसीएलबरोबर करार करणार असल्याचं कळतंय. जर युसूफ आयसीएलसाठी खेळला तर आपोआपच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याच्यावर बंदी आणणार आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम लागणार आहे. पाकिस्तान या महिन्याच्या अखेरीस अबू दाबी येथे वेस्ट इंडिज विरुद्ध वन-डे सिरिज खेळणार आहे.

close