ढोलकिया बिल्डरवर हल्ल्या प्रकरणी दाऊद गँगच्या चौघांना अटक

February 10, 2011 3:56 PM0 commentsViews: 6

10 फेब्रुवारी

बिल्डर मनीष ढोलकिया यांच्यावरील हल्ला प्रकरणात दाऊद गँगच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी ही कारवाई केली. ढोलकिया यांचे नातेवाईक दाऊद गँगशी संबधीत आहेत. त्यामुळे हा हल्ल्याचा प्रकार म्हणजे डी कंपनीतील गँगवॉर असल्याचं म्हंटलं जातं आहे. रामदास रहाणे, गिताराम जाधव उर्फ माऊली, प्रवीण मिश्रा आणि अभिषेक सिंग अशी या चारजणांची नाव आहेत. मरिन लाईन्स परिसरातल्या शारदा चेंबर्स मध्ये बिल्डर मनीष ढोलकिया यांचं ऑफिस आहे. याच ठिकाणी ढोलकिया यांना मारण्यासाठी प्रविण मिश्रा आणि अभिषेक सिंग दोघे शूटर गेले होेते. त्यावेळी मनीष नसल्याने शूटर्संनी केलेल्या गोळीबारात अजित येरुणकर हा ढोलकिया यांच्या बॉडीगार्ड ठार झाला होता. या हल्यात डी. कंपनीचा हात असल्यास आता स्पष्ट झालं आहे.

close