पत्रकारांचा मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार

February 10, 2011 4:04 PM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांविषयी केलेल्या विधानाबाबत सरकारने भूमिका जाहीर करावी या मागणीसाठी औरंगाबादच्या सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्र्यासंह सर्वच मंत्र्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघटना, मराठवाडा टेलिव्हीजन जर्नालिस्ट असोसिएशन वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनांनीही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला आहे. औरंगाबाद इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या ई- गव्हर्नन्ससह इतर सर्व कार्यक्रमांवर पत्रकारांनी बहिष्कार टाकला. काळया फिती लावून पत्रकार बाहेरच थांबले. यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेविषयीही आक्षेप घेण्यात आला. पालकमंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकू नये अशी विनंती केली मात्र पत्रकारांनी ती फेटाळून लावली. पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधातील विधेयक मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे प्रसारमाध्यमांविषयी केलेल्या वक्त्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. मुंबईतील सोळा पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकल्यानंतर आता राज्यभरात आंदोलन होत आहे.

close