मीडिया बंदीबद्दल अजितदादांनाच विचार – मधुकर पिचड

February 10, 2011 12:21 PM0 commentsViews: 5

10 फेब्रुवारी

नांदेडच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियावर तर बंदीच घातली पाहीजे असं वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं हात झटकले आहे. याबद्दल अजित पवारांनाच विचारा अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी जयंत जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

close