कोकणच्या समुद्रात परराज्यातल्या मच्छीमारांवर कारवाईची मागणी

February 10, 2011 4:27 PM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी

कोकणच्या समुद्रात परराज्यातल्या मच्छीमारांकडून सुरू असलेल्या बेसुमार मासेमारीविरोधात रत्नागिरीतले मच्छिमार संतप्त झाले आहे. गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात या राज्यातल्या शेकडो अद्ययावत यांत्रिकी नौका कोकणजवळच्या समुद्रात अनिर्बंध मासेमारी करत असतात. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. या नौकांना पकडण्यासाठी अनेक वेळा सांगूनही कस्टम्स किंवा मत्स्य विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. येत्या आठ दिवसात ही कारवाई झाली नाही तर समुद्रात जो काही संघर्ष निर्माण होईल त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही यावेळी मच्छिमारांनी दिला. प्रशासनाने या परप्रांतिय बोटी पकडल्या नाहीत तर स्वत: या बोटी पकडून आणण्याचा इरादाही या मच्छिमारांनी केला.

close