गंभीर नागपूर टेस्ट खेळू शकणार नाही

November 4, 2008 5:55 PM0 commentsViews: 3

04 नोव्हेंबर नागपूर,भारताचा स्टार ओपनर गौतम गंभीरवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता तो नागपूर टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. गंभीरच्या ऐवजी आता फॉर्मात असलेला , तामीळनाडूचा ओपनर एम. विजयनची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या अपील कमिशनरनं त्याचं अपील फेटाळून लावलं. दिल्ली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वॅटसनला धक्कामारल्यामुळे त्यांच्यावर मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी एका टेस्टसाठी बंदी लादली होती. या बंदीविरोधात गंभीरनं अपील केलं होतं. याचा निकाल येईपर्यंत त्याच्यावरील बंदीला स्थगिती मिळाली होती. पण हे अपीलचं फेटाळल्यामुळे गंभीरवरील बंदी कायम राहिली. गंभीरची बाजू ऐकून न घेताच हा निकाल दिल्यानं बीसीसीआयनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

close