अवैध धंद्यांचे 12 अनधिकृत ढाबे उध्वस्त

February 10, 2011 4:44 PM0 commentsViews: 6

10 फेब्रुवारी

ठाणे जिल्ह्यातल्या मुंबई – अहमदाबाद द्रुतगती मार्गावरील अवैध धाब्यांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई केली. या कारवाईत 12 ढाबे तोडले आहेत. या धाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु होते. दोन वर्षापूर्वी इथं कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकार्‍यांवर खुनी हल्ला झाला होता. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. चिल्लर फाटा इथं आदिवासींच्या जमीनीवर अनधिकृतपणे राजरोस ढाबे सुरु होते. याठिकाणी पेट्रोल माफिया भेसळीचं काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 3 जेसीबी आणि एक पोकलेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 ढाबे तोडण्यात आले.

close