एस बँड घोटाळ्या प्रकरणी समितीची नेमणूक

February 10, 2011 5:53 PM0 commentsViews: 5

10 फेब्रुवारी

देवास आणि अँट्रिक्स यांच्यात झालेल्या कराराचा आढावा घेण्यासाठी सरकारनं दोन सदस्यांची समिती नेमली आहे. माजी कॅबिनेट सेक्रेटरी बी. के. चतुर्वेदी आणि स्पेस कमिशनचे रोड्डम नरसिंह यांची यात नियुक्ती करण्यात आली आहे. हा करार जेव्हा संमत करण्यात आला तेव्हा बी. के. चतुर्वेदी कॅबिनेट सचिव होते. तसेच ज्या स्पेस कमिशनचा हा करार संमत करण्यात सहभाग होता त्या स्पेस कमिशनचे रोड्डम नर सिंह हे सदस्य होते. पण या समितीवर भाजपने टीका केली. पण या प्रक्रिेयेतले गैरव्यवहार हो दोन सदस्य कसे उघड करतील अशी शंका भाजपनं बोलून दाखवली आहे.

close