काळ्या पैशाबाबत ठोस पावलं उचलणार !

February 10, 2011 5:56 PM0 commentsViews: 1

10 फेब्रुवारी

काळ्या पैशाबाबत ठोस पावलं उचलू असं आश्वासन केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात दिलं आहे. तसेच हवाला फेम हसनअली हा देश सोडून जाणार नाही याचीही काळजी घेणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. हसनअलीचे स्वीस बँकेत 8 ते 9 बिलियन डॉलर्स असल्याची शंका आहे. तसेच परदेशी बँकांमध्ये पैसे ठेवणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांची नावंही जाहीर करणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 3 मार्चला होणार आहे.

close