मुंबईच्या समुद्रावर डिझेल माफियाचं राज्य !

February 10, 2011 6:06 PM0 commentsViews: 3

विनय म्हात्रे मुंबई

10 फेब्रुवारी

मुंबईच्या समुद्रात खुलेआम डिझेलची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या तस्करीचा नवा अड्डा आहे नवी मुंबई. या नवी मुंबईतून गेल्या पंचवीस वर्षांपासून या डिझेल तस्करीची सूत्र हलवणार्‍या सदरुचा आता पोलीस शोध घेत आहे. पण मग गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईचा समुद्र किनारा…या अथांग समुद्रावर राज्य आहे ते चक्क माफियाचं. गेल्या अनेक वर्षांपासून हा समुद्र म्हणजे स्मगलिंगचा राजमार्ग होय. सोनं, चांदी, हिर्‍यांच्या स्मगलिंगबरोबरच या समुद्रातून मोठ्या प्रमाणावर स्मगलिंग होते ती डिझेलची. हा समुद्र म्हणजे तेल माफियांचा अड्डा बनला आहे. त्यानंतर मोठा अड्डा आता बनलाय तो म्हणजे नवी मुंबई. या दोन्ही अड्‌ड्यांना डिझेल पुरवठा करणारा अड्‌डा म्हणजे दुबई.

दुबई हे तर माफियांचं माहेरघर, याच दुबईतून तेल माफिया अत्यंत स्वस्त दरात डिझेल विकत घेतात आणि मग तेच डिझेल मुंबईत चढ्या भावाने विकतात.दुबईत डिझेल खरेदी केल्यानंतर बोट निघते ती मंुबईच्या दिशेनं या प्रत्येक बोटीत असते अव्वल दर्जाचं कमीत कमी 2 लाख लीटर डिझेल अवघ्या दोन दिवसात ही बोट पोचते भाऊच्या धक्क्यावर कुठल्याही आडकाठी शिवाय अशा जवळपास 3 ते 4 बोटी मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर पोहचतात आणि सर्वात जास्त 15 ते 20 बोटी ह्या नवी मुंबईच्या बेलापूरमधल्या रेतीबंदरावर उतरवल्या जातात. मुंबईत येणार्‍या डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक आहे तो म्हणजे मुंबईतला मच्छिमार तर नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये पोहचलेलं डिझेल विकलं जातं ते वाळू माफियांना. राज्यभर पसरलेल्या वाळू माफियांना डिझेल सप्लाय केलं जातं ते याच नवी मुंबईच्या बेलापूरमधून.

या स्मगलिंगचा मास्टरमाईंड आहे सदरु. हे सगळे स्मगलिंग चालत ते सदरुच्या इशार्‍यावर सदरु खरं तर या सर्व काळ्या धंद्यांचा फायनान्सर आहे. बेलापूरमध्ये बसून हा सदरु दुबई ते मुंबई डिझेल स्मगलिंगच नेटवकीर्ंग करतो. पण हा सदरु किंग झाला कसा या धंद्याचा याआधी गॉडफादर होता मोहम्मद अली .मोहम्मद अलीचा उजवा हात चाँद. मुंबईच्या बंदरावर राज्य करणार्‍या चाँदचा खून झाला आणि मोहम्मद अलीही गजाआड गेला त्यानंतर या काळ्या धंद्याचा बॉस सदरु झाला. सदरु आपल्या धंद्याची सूत्र हलवतो ते नवी मुंबईतल्या एनआरआय कॉम्प्लेक्समधून आणि पारसिक हिलवर सदरुचा आलिशान बंगला आहे. ऑक्टोबरमध्ये सदरु पहिल्यांदा पोलीस रेकॉर्डवर आला. नवी मुंबई क्राईम ब्राँचने सदरुला अटकही केली होती. त्याने दोन महिने तुरुंगात काढले. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला पण तेव्हापासूनच तो फरार आहे.

मनमाड जळीतकांड घडलं आणि पोलिसांना आठवला सदरु त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरु झाली ती सदरुला शोधण्याची पण हा डिझेल डॉन केव्हाच नौ दो ग्यारह झाला होता.

close