पुतण्यासाठी काकांची माफी !

February 11, 2011 8:54 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकारविरोधी विधानाबद्दल आता शरद पवार यांनी माफी मागितली आहे. अजित पवार जर चुकीचं बोलले असतील आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या पत्रकारांची मनं दुखावली असतील तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माफी मागतो. असं शरद पवार कोल्हापुरात म्हणाले. मात्र नांदेडमध्ये नेमकं काय घडलं याचं क्लिपींग तज्ञ पत्रकारांनी पहावं असं म्हणत, शरद पवारांनी पुन्हा चेंडू मीडियाच्या कोर्टात टोलवला. तसेच 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या शाहिद बलवाशी संबंध नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.बारामतीमधल्या उद्योगांमध्ये बलवाची भागीदारी असल्याचंही त्यांनी नाकारलं आहे. दरम्यान शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा करण्यासाठी पत्रकार संघटनांची दुपारी बैठक होणार आहे. अजित पवारांच्या कार्यक्रमांवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यायचा का याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

close