नाशिकमध्ये कांद्याची बाजारपेठ बंद

February 11, 2011 9:05 AM0 commentsViews: 24

11 फेब्रुवारी

कांद्याच्या हमीभावावरुन शेतकरी संतप्त आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्यावरची निर्यातबंदी उठेपर्यंत सर्व मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय शेतकरी आणि व्यापार्‍यांनी घेतला आहे. प्रति क्विंटल दीड हजार रुपये दर मिळत नाही तोपर्यंत कांदा विकणार नाही अशी शेतकर्‍यांची भूमिका आहे. लासलगाव बाजार समितीनं बोलावलेल्या बैठकीतही यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे समितीनं राज्य सरकारशी संपर्क साधला होता. तर कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केंद्र सरकारकडे निर्यातबंदी हटवण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. राज्याचे एक शिष्टमंडळ दिल्लीला वाणिज्य सचिवांची भेट घेण्यासाठी आज दुपारी जाणार आहे. दरम्यान, संतप्त शेतकर्‍यांनी येवला मार्केट बंद पाडलं आहे. कांद्याला हमीभाव मिळावा आणि निर्यातबंदी मागे घ्यावी अशा मागणी शेतकर्‍यांनी केली.

काल गुरूवारी कांद्याच्या भावला मीच जबाबदार कसा असा सवाल करणारे कृषीमंत्री शरद पवार यांनीही कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याबाबत ठोस भूमिका घेतली आहे. कांदा आणि साखरेवरील निर्यातबंदी उठवण्याची गरज आहे असं व्यक्त पवारांनी केलं.

close