विधान परिषद निवडणुकीसाठी सेनेकडून राहुल नार्वेकर

February 11, 2011 10:09 AM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारी

पक्षातून जाणार्‍यांना सहजासहजी कुठली पद मिळू देणार नाहीत असे संकेतच आज शिवसेने दिले आहे. किरण पावसकरांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीसाठी आज सेनेनं राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवलं आहे. पावसकर यांनी याआधीच राष्ट्रवादीतून या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. आज राहुल नार्वेकर यांनी या जागेसाठी आपला अर्ज भरला. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, आमदार बालाजी किणीकर, परशुराम उपरकर आदी आमदार हजर होते. सत्ताधार्‍यांनी आपल्या बहुमताच्या जोरावर या निवडणुकीत जरी विजय मिळवला तरीही नार्वेकर यांची उमेदवारी ही राज्यातल्या सर्वसामान्यांच्या प्रक्षोभाचं प्रतिक आहे असं रावतेंनी यावेळी सांगितलं आहे.

close