धुळ्यात आदिवासींचे मोठ आंदोलन

February 11, 2011 10:20 AM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी

धुळे जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी संध्याकाळपासून 4 हजार आदिवासी ठाण मांडून बसले आहेत. कसत असलेल्या वनजमिनींचे सातबारा मिळेपर्यंत उठणार नाही असा त्यांचा निर्धार आहे. नियमाप्रमाणे रेशनवर 35 किलो धान्य मिळावे, कायद्याप्रमाणे रोजगार मिळावा, पवनउर्जा कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीची चौकशी व्हावी या त्यांच्या मागण्या आहेत. त्यासाठी ते 80 किलोमीटर पायी चालत डोक्यावर बिर्‍हाड घेवून कलेक्टरच्या भेटीला आले आहेत. त्यासाठी सत्यशोधक कष्टकरी संघटनेच्या वतीने 7 फेब्रुवारीपासून जिल्हाभर पायी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारपासून हे आदिवासी जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत. रात्रभर लहानगे आणि वृद्धांसोबत तिथेच थंडीत कुडकुडत त्यांनी चुली मांडल्या आहेत.

close