अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष बनले बराक ओबामा

November 5, 2008 7:35 AM0 commentsViews: 5

5 नोव्हेंबर, वॉशिंग्टनअमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा विजयी झाले आहेत. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीनं राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. आतापर्यंत ओबामांना 333 इलेक्ट्रोल मतं मिळाली असून प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे मॅक्केन यांना 155 मतं मिळाली आहेत. सुरुवातीपासूनच अनेक राज्यात आघाडीवर असलेल्या बराक ओबामांनी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. ओहिओसारखं राज्य जिंकल्यावरच ओबामांचा विजय स्पष्ट झाला होता. ओबामांच्या विजयानंतर अमेरिकन जनतेनं जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या अनेक पारंपरिक मतदारांनीही यावेळी डेमॉक्रॉटिकच्या बराक ओबामांना मतदान केलं. अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुक ीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बराक ओबामांनी बाजी मारली आहे.आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार ओबामा यांनी 338 तर त्यांचे प्रतिस्पर्धी जॉन मॅक्केन यांनी 163 मतं मिळवली आहेत. विजयासाठी 538 जागांपैकी 270 मतांची गरज होती. ओबामांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 च्या आतच हा टप्पा ओलांडुन व्हाईट हाऊस काबीज केलं. कॅलिफोनिर्या, ओहायो, आयोवा, व्हजिर्निया या राज्यांमध्ये ओबामांना मिळालेली आघाडी निर्णायक ठरली. एकूण 51 राज्यांपैकी ओबामा यांनी 27 तर मॅक्केन यांनी 21 राज्यात विजय मिळवला. ओहायो हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो.पण ओहायोमध्येदेखील रिपब्लिकन पक्षाचं वर्चस्व मोडून काढून ओबामांनी मुसंडी मारली. अद्यापही मिझुरी, इंडियांना आणि नार्थ कॅरोलिना या राज्यांचा निकाल येणं बाकी आहे, पण ओबामा यांच्या स्पष्ट विजयानंतर त्याचा निकालावर काहीच फरक पडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. निकालानंतर आपल्या समर्थकांसमोर बोलताना ओबामा यांनी बदलाची हाक दिली. ' अमेरिका हा सगळी स्वप्न पूर्ण करणारा देश आहे. सगळं जग सध्या मंदीचा सामना करत आहे. इतरही बरीच आव्हानं आहत पण आपण ती सगळी पार करून दाखवू '.यावेळी त्यांनी ' एस वुई कॅन 'चा नवा मंत्र दिला.

close