दूध 3 रूपयांनी महागले

February 11, 2011 10:41 AM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारी

महागाईच्या आगीत आता दूधाची झळ सर्वसामान्यांना लागणार आहे. एकाच महिन्यात दुसर्‍यांदा दुधाची दरवाढ करण्यात आली आहे. दूधाचे भाव आणखी 3 रुपयाने वाढले आहे. खाजगी दूध कंपन्यांची कात्रज दूध महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ तुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गायीचं दूध 29 रुपये तर म्हशीचं दूध 36 रुपये लीटर या भावाने मिळणार आहे. ही भाववाढ 16 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

close