मस्ती करतो म्हणून विद्यार्थ्याला शाळेत नग्न करून फिरवले !

February 11, 2011 10:55 AM0 commentsViews: 8

11 फेब्रुवारी

एका शालेय विद्यार्थ्याला शाळेत नग्न फिरवण्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपारा भागातील संकेश्वरनगर परिसरातल्या सेंट अलोयशीश हायस्कूलमध्ये ही घटना घडली. ज्युनिअर केजीतील विद्यार्थ्याला नग्न करुन शाळेत फिरवण्यात आलं. शाळेत मस्ती करतो आणि दुसर्‍या मुलांचे डबे खातो या कारणावरुन ही शिक्षा करण्यात आली. शाळेतील गवारे या शिक्षिकेनं ही शिक्षा केली. याप्रकरणी पालकांनी जाब विचारला होता. पण पोलिसांनी पालकांवरच गुन्हा दाखल केला.

close