जळगावमध्ये महाठग जडेजाला अटक

February 11, 2011 11:14 AM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारी

जळगाव पोलिसांनी डॉ.अशोक जडेजासह तिघांना अहमदाबाद इथं ताब्यात घेतलं आहे. देशात जवळपास 5 हजार कोटीचा अपहार केल्याचा ठपका डॉ.जडेजावर ठेवण्यात आला आहे. अडीच कोटी रकमेची फसवणूक करुन अपहार केल्याचा गुन्हा जळगाव पोलिसात दाखल आहे. त्यानुसार अशोक जडेजासह त्याची पत्नी रितूबेन आणि सहकारी हक्कमभाई राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंजार समाजाचे श्रध्दास्थान असलेली श्री वाहनवटी सीकोतर माता आपल्याला प्रसन्न असल्याची जाहिरात त्याने देशभर केली होती. तसेच रक्कम तिप्पट करुन देण्याचं आमिष दाखवून हजारो कंजार बांधवांची फसवणूक केली. 7 राज्यात जडेजाविरुध्द 65 गुन्ह्यांची नोंद आहे. सीकोतर माता आपल्याला प्रसन्न असून 30 दिवसात पैसे तीनपट करुन देण्याचे वरदान आपल्याला देवीनं दिल्याचा दावा डॉ जडेजा करायचेअसल्याचे कंजर तक्रारदारांचे म्हणणं आहे. जडेजा फसवणूक घोटाळ्यातील सर्व पिडीत हे एकाच कंजर समाजाचे आहेत. पोलीस उपनिरीक्षक श्याम निकम यासह 7 कर्मचार्‍यांच्या पथकानं या तिघांना ताब्यात घेऊन जळगावला आणलं आहे.

close