अजितदादांच्या कार्यक्रमावरचा पत्रकारांचा बहिष्कार मागे

February 11, 2011 11:30 AM0 commentsViews: 7

11 फेब्रुवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकारविरोधी विधानाबद्दल कृषीमंत्री शरद पवार यांनी माफी मागितली आहे. अजित पवार जर चुकीचं बोलले असतील आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या पत्रकारांची मनं दुखावली असतील तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माफी मागतो. असं शरद पवार कोल्हापुरात म्हणाले. दरम्यान, पत्रकारांवरील हल्ला विरोधी कृती समितीची आज दुपारी संदर्भात बैठक पार पडली. अजित पवार यांनी केलेल्या विधानाची शहानिशा करण्याची गरज नाही. पण कृषीमंत्री शरद पवार यांचा आदर दाखवत मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यावरच्या कार्यक्रमांवरचा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. नांदेडमधल्या कार्यक्रमात मीडियावर तर बंदीच घालायला हवी असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं.

close