ऑस्ट्रेलियन टीम भारतात दाखल

February 11, 2011 11:56 AM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेतली गतविजेती टीम ऑस्ट्रेलिया सलग चौथ्यांदा जेतेपद पटकवण्यासाठी आज भारतात दाखल झाली. पॉण्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन टीमचे बंगळुरुमध्ये आगमन झाले आहे. बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुध्द प्रॅक्टिंस मॅच खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध नुकतीच झालेली वन-डे सीरिज ऑस्ट्रेलियाने 6-1 अशा मोठ्या फरकाने जिंकली होती. या विजयामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. यंदाचं जेतेपद पटकावल्यास सलग तीन वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकॉर्ड कॅप्टन रिकी पॉण्टिंगच्या नावावर जमा होणार आहे. पण ऑस्ट्रेलिया टीमलाही दुखापतीनं सतावलं आहे. प्रमुख बॅट्समन माईक हसी आणि ह्युरित्झला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.

close